Buldhana Biodiesel Pump Accident
esakal
नांदुरा / मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील नायगाव (Buldhana Biodiesel Pump Accident) फाट्यानजिक असलेल्या बायोडिझल पंपावर बायोडिझल पंपाच्या टाकीत जीव गुदमरून दोन युवकांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना ता. २५ सप्टेंबरच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशनची रेस्क्यू टीमने दाखल होऊन अंत्यवस्थ असलेल्यांना त्वरित मलकापूर येथील रूग्णालया भरती करण्यात आले आहे.