Georai News : बैलांच्या खांद्यावरील ओझे होईना कमी; आधुनिक तंत्रज्ञान युगातही बहुतेक साखर कारखान्याला बैलगाडीतूनच होते ऊस वाहतुक

बीड जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याला अजूनही बैलजोड्यांच्या खांद्यावर ऊसाच्या मोळ्यांचे ओझे ठेवले जात आहे.
bullock cart load
bullock cart loadsakal
Updated on

गेवराई - ऊस तोड मजुर पुरवठा व तोडणी मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याला अजूनही बैलजोड्यांच्या खांद्यावर ऊसाच्या मोळ्यांचे ओझे ठेवले जात आहे. उसाचे ओझे व चाबकाचे फटके सहन करत बैलांना पायपीट करावी लागत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाहतुकीची अनेक साधने निर्माण झाली. त्यामुळे आतातरी बैलगाडी वाल्या 'दादा' बैलांच्या खांद्यावरील ओझे उतरविण्याची गरज आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. शेतीच्या कामासाठी तसेच वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात बदल निर्माण झाले आहेत.

पूर्वी वाहतुकीची फारशी व्यवस्था नसल्याने बैलगाडी हे वाहतुकीचे एकमेव साधन होते. विशेषतः गूळ निर्मितीसाठी शेतीपासून गु-हाळापर्यंत ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर होत होता. नंतर साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक झाली. वाहतुकीची इतर साधने उपलब्ध नसल्याने ऊसाच्या मोळ्यांचे दोन ते अडीच टनाचे ओझे बैलगाडीवर ठेवून वाहतूक केली जात होती.

क्षमतेपेक्षा अधिक ओझे ठेवले जात असल्याने अक्षरशःबैलगाडीचा समोर भाग वरपर्यंत उचलला जात होता. हा प्रकार बैलांसाठी धोकादायक ठरत होता. शेतातील चिखल, रस्त्यावरील खड्डे, चढ, उतार अशा टप्प्यात बैलजोड्यांना कसरत करावी लागत होती. असे अडचणींचे टप्पे पार करताना हमखास बैलांना चाबकाचे फटके खावे लागत होते.

वाहतुकीला पर्याय व्यवस्था नसल्याने हा त्रास बैलांना अनेक वर्षे सहन करावा लागला. याबाबत मात्र, कधीही शासनाकडे किंवा सरकारकडे तक्रार केली नाही. त्यानंतरच्या काळात तंत्रज्ञाना वापर वाढला. वाहतुकीला पर्याय तयार झाले. प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेले. विशेषतः ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलगाडीची जागा ट्रॅक्टर,ट्रकने घेतली.

त्यामुळे बैलांच्या खांद्यावरील ओझे संपूर्ण नव्हे परंतु, काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली वेळेची बचत, कमी वेळेत वेगाने कामे होऊ लागली. ट्रॅक्टर ट्रॉली, मिनी ट्रॅक्टर तसेच ट्रकच्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाऊ लागली. मात्र असे असले तरी अजूनही बैलांच्या खांद्यावरील उसाचे ओझे पूर्णपणे उतरले नाही.

काही भागात आताही ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीचाच वापर केला जातो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगातही ऊसाच्या ओझ्याचा त्रास बैलजोड्या सहन करावा लागतो आहे. अनेक वेळा या बैलांना जीव ही गमवावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com