बंधपत्रित डॉक्‍टरांच्या खांद्यावर ईएसआयएस रुग्णालयाचा भार

बंधपत्रित डॉक्‍टरांच्या खांद्यावर ईएसआयएस रुग्णालयाचा भार

औरंगाबाद - एमआयडीसी चिकलठाणा येथील राज्य कामगार विमा योजनेच्या शंभर खाटांच्या रुग्णालयात एकूण ३०५ पदांपैकी अर्धीअधिक पदे रिक्त आहेत. बारा बंधपत्रित, दोन कंत्राटी तर तीन नियमित डॉक्‍टर असे १७ डॉक्‍टर रुग्णालयाचा भार पेलत आहेत. त्यामुळे वर्षभरात सेकंडरी केअरसाठी घाटीसह मुंबईतील जेजे व केईएम रुग्णालयात दोन ते अडीच हजार रुग्ण संदर्भित करावे लागत आहेत. 

राज्य कामगार विमा योजना सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय पाच मे रोजी राज्य शासनाने घेतला. त्यामुळे सोसायटीअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना ‘अच्छे दिन’ येण्याची शक्‍यता आहे. 

सध्या रुग्णालयाच्या विविध संवर्गातील पदे भरण्याची प्रक्रिया मुंबईतून सुरू असून परिचर्या संवर्गातील रिक्त जागा भरल्या जात आहेत. शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून औषधींच्या तुटवड्यावर ईएसआयएसने तोडगा काढला असून  आठवडाभरात सर्व औषधी उपलब्ध होतील, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

निम्मी रिक्त पदे ठरताहेत डोकेदुखी
स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जन व वैद्यकीय अधीक्षकांची गरज
डॉक्‍टरांची ५, पॅरामेडिकलची ९ तर चतुर्थश्रेणीची ९९ पदे रिक्त 
जिल्ह्यात १ लाख ७६ जणांसाठी एक रुग्णालय, चार दवाखाने 
वर्षभरात करारातील नऊ रुग्णालयांत २,४४७ रुग्णांना सुपरस्पेशालिटी उपचार
वर्षभरात सेकंडरी केअरसाठी घाटी, जेजे, केईएममध्ये २२३५ रुग्णांवर उपचार

ईएसआयएस रुग्णालयासह वाळूज, खडकेश्‍वर, हडको, मुकुंदवाडी येथील ओपीडी संख्या दररोज दोनशे ते अडीचशे आहे. शुक्रवारी ही संख्या चारशेपर्यंत जाते. प्राथमिक, द्वितीय व सुपरस्पेशालिटीचे उपचार ईएसआयएस उपलब्ध करून देते. त्यासाठी दहा रुग्णालयांशी करार आहे. विहित नमुन्यात अर्ज केल्यास २४ तासांत उपचार उपलब्ध होतो. 
- डॉ. विवेक भोसले, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com