

Khed Shocked as Burglars Raid Eight Homes and Enjoy Puran Poli During Theft
esakal
-नीलकंठ कांबळे
लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा तालुक्यातील खेड येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल आठ घरांवर डल्ला मारला. या घरफोड्यांमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोठी रोख रक्कम लंपास करण्यात आली. विशेष म्हणजे चोरी करताना चोरट्यांनी एका घरातील पुरणपोळ्यांवरही ताव मारत तूप व दूधही फस्त केल्याचा प्रकार समोर आला.