लॉकडाउनमध्ये घरफोडी !

file photo
file photo

परभणी : सध्या लॉकडाउनमुळे नागरिक घरातच थांबुन असल्याने चोरीच्या घटनांत कमालीची घट झाली असताना सय्यदमिया पिंपळगाव (ता.परभणी) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ९८ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (ता.चार) रात्री घडली.
पिंपळगाव येथील धनंजय नागनाथराव मोरे यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या परिवारासह घराच्या छतावर झोपलेले असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. खोलीत ठेवलेल्या लाकडी पलंगाच्या बॉक्समधील तीन लाख ८८  हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये असा एकुण ३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक फौजदार पठाण यांनी गुन्हा नोंदवुन घेतला असून तपास  सहायक फौजदार गीते करत आहेत.

हेही वाचा- करडई संशोधन प्रकल्पास मंजुरी

हेही वाचा....
रेल्वेरुळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह 
परभणी :
परभणी ते तरोडा रेल्वेगेट दरम्यान, ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रेल्वेरुळावर अढळुन आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 
रेल्वेचे कर्मचारी सिध्दार्थ गायकवाड हे रविवारी (ता.पाच) परभणी ते तरोडा गेट दरम्यान, रेल्वेरुळाची पाहणी करत असताना त्यांनी तरोडा गेटच्या जवळ रुळावर मध्यभागी ४० वर्षीय व्यक्तीचा कटलेला अवस्थेत मृतदेह अढळुन आला. त्याच्या अंगावर काळ्या रंगाची पॅन्ट, पांढऱ्या रंगाचे शर्ट आहे. ओळख पटविण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सुभाष चव्हाण करत आहेत.

हेही वाचा- जलसंधारणामुळे दुष्काळी गावातील बहरल्या फळबागा

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा
सोनपेठ (जि.परभणी) :
अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळवून बालकास जन्म दिल्यामुळे एक जणांविरुद्ध सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामोनी तांडा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील एका बावीसवर्षीय तरुणाचे तांड्यावरील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळून आले. त्यांच्या प्रेमास घरच्यांचा विरोध असल्याने सदरील युवकाने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह केला. ती मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी विवाह करून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. या संबंधातून ती मुलगी गरोदर राहून एका अपत्यास जन्म दिला. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी सदर आरोपी तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाणे कराड (जि. सातारा) येथे तक्रार दिली. सदरील घटना सोनपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे सातारा पोलिसांनी हा गुन्हा ता. चार मार्च रोजी सोनपेठ पोलिसांकडे वर्ग केल्याने सोनपेठ पोलिसांनी तरुणांविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार व इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com