चाळीसगाव घाटात बस-कंटनेरची धडक

राजेंद्र भोसले
रविवार, 1 सप्टेंबर 2019

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव घाटात म्हसोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच 20 बीएल 3804) व चाळीसगावहून येणारा कंटेनर यांच्यात समोरासमोर रविवारी (ता.एक) सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान अपघात झाला. औरंगाबाद-धुळे बस औरंगाबादहून धुळेकडे जात होती.

कन्नड, ता.1 (जि.औरंगाबाद) ः सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव घाटात म्हसोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच 20 बीएल 3804) व चाळीसगावहून येणारा कंटेनर यांच्यात समोरासमोर रविवारी (ता.एक) सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान अपघात झाला. औरंगाबाद-धुळे बस औरंगाबादहून धुळेकडे जात होती.

या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव येथील आगार व्यवस्थापक, ग्रामीण पोलीस व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात 7 ते 8 प्रवाशी जखमी झाले असून जखमींना चाळीसगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी महामार्ग पोलीसांना घटनास्थळी मदत केली. सध्या महामार्गाचे काम सुरु असून त्यात पाऊस सुद्धा सुरु आहे. यामूळे रस्त्याच्या बाजूची माती ओली होऊन जड वाहनाचे चाके चिखलात रुतुन अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही, म्हणून घाटातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावकाश वाहने चालावे असे आवाहन महामार्ग पोलीस निरीक्षक नामदेवराव चव्हाण यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus-Cantainer Hit At Chalisgaon