बस-दुचाकीच्या अपघातात एक ठार, बीड जिल्ह्यातील घटना

प्रवीण फुटके
Thursday, 31 December 2020

परळी - धर्मापुरी रस्त्यावर बस व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.३१) सकाळी आठच्या सुमारास घडली.

परळी वैजनाथ (जि.बीड) : परळी - धर्मापुरी रस्त्यावर बस व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.३१) सकाळी आठच्या सुमारास घडली. येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी-धर्मापुरी रस्त्यावर धर्मापुरीहुन परळीकडे येणाऱ्या (एमएच २० बीएल १८८८) बसचा व परळीहून धर्मापुरीकडे जाणाऱ्या मोटारसायकला (एमएच २६ एवाय ४३३५) गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास सारडगाव जवळ अपघात झाला.

 

 

या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण जखमी झाला आहे. राजाभाऊ बाबुराव राठोड (वय ३८) व बळीराम राठोड हे दोघे आपल्या शेतात खताच्या गोण्या घेऊन दुचाकीवरून जात असताना समोरून येत असलेल्या बसला जोराची धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात राजाभाऊ बाबुराव राठोड (रा.खोडवा सावरगाव तांडा) यांचा जागीच मृत्यू झाला. बळीराम पिकाराम राठोड (रा.खोडवा सावरगाव तांडा) या जखमीस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Two wheeler Accident One Died, Incident Occurred In Beed District