बीड : कोकणातील गौरी गणपती पाहण्यासाठी मुंबई येथून कोकण जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ अधिक असल्याने राज्यभरातून राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून जादा बसेस मागवून सोय केली जाते. यात बीड जिल्ह्यातून २८५ बस कोकणच्या प्रवाशांच्या सोयीसाठी पाठविण्यात आल्या..यामुळे कोकणच्या प्रवाशांची सोय झाली असली, तरी जिल्ह्यातील प्रवाशांची मात्र गैरसोय झाली आहे. खेड्यापाड्यांसह अनेक लांब पल्ल्याच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने तासनतास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे..गौरी-गणपतीसाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी दरवर्षी रापमच्या विभागातून बस मागितल्या जातात. त्याप्रमाणे याहीवर्षी बीड जिल्ह्यातून २८५ बस पाच दिवसांसाठी पाठविण्यात आल्या. दोन दिवस सुट्या आल्यामुळे नागरिकांनी गावी जाण्यासाठी बीड बसस्थानकात गर्दी केली. मात्र, जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून आले..बीड आगारातून ५४ फेऱ्या रद्दकोकणकरांच्या सोयीसाठी जिल्ह्यातून बस पाठविल्यानंतर एकट्या बीड आगारातून शनिवारी ५४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर रविवारी दुपारपर्यंतच शनिवारच्या फेऱ्यांपेक्षाही जास्तचा आकडा फेऱ्यातील रद्दमध्ये झाल्याची माहिती बीड आगार वाहतूक विभागाने सांगितले..कोणत्या आगारातून किती बस पाठविल्याबीड ४०उदगीर ४८आष्टी३५पाटोदा ३५परळी ३०गेवराई ३३अंबाजोगाई४९धारूर २५माजलगाव ३०.Beed Crime: पैशांच्या वादातून भावंडांवर सहा जणांचा जीवघेणा हल्ला.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यातील आठ आगारांतील ५१० बसपैकी मागणीनुसार २८५ बस पाठविल्या आहेत. यामुळे स्थानिक प्रवाशांची काही प्रमाणात अडचण झाली आहे. परंतु, ई-बस आणि शिवाई बसच्या माध्यमातून प्रवाशांची सोय केली जात आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या गर्दीनुसार बस पाठविल्या जात आहेत.- श्री राजकुमार दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी, बीड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.