esakal | ‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

korona virus desease logo.jpg

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने नोवेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेच्‍या अनुषंगाने सार्वजनीक हित लक्षात घेऊन महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या दिनांकात पुढीलप्रमाणे बदल केला आहे. 

‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्‍यसेवा (पूर्व) परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्‍यामुळे ता. एक एप्रिल रोजी राज्‍यसेवा पूर्व परीक्षेच्‍या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण रद्द करण्‍यात आले आहे. याची परीक्षाकामी नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंद घ्‍यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपायामुळे बदल
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने नोवेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेच्‍या अनुषंगाने सार्वजनीक हित लक्षात घेऊन महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या दिनांकात पुढीलप्रमाणे बदल केला आहे. 

हेही वाचा....समाधानी जीवन जगण्याची गरज, कशासाठी? ते वाचाच

प्रशिक्षण पुढे ढकलले
राज्‍यसेवा (पूर्व) परीक्षा २०२० ही रविवारी ता. पाच एप्रिल २०२० ऐवजी रविवारी ता. २६ एप्रिल २०२० रोजी होणार आहे. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० ही रविवार ता. तीन मे २०२० ऐवजी रविवार ता. १० मे २०२० रोजी होईल. त्याअनुषंगाने परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

हेही वाचलेच पाहिजे....कोरोना ः परदेशातून आलेल्या त्रेपन्न जणांचे अहवाल निगेटिव्ह

भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्या 
कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकावर शासनाने कडक कारवाई करून शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

व्यापाऱ्याकडून भाजीपाला कमी दराने खरेदी
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जागा किंवा एखादे ठिकाण भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा माल व्यापारी कमी दराने खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शहरात योग्य ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. जेनेकरून माल विक्री करण्यास अडचण होणार नाही व त्याच बरोबर त्यांना पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास होणार नाही. याची दक्षता शासनाने घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, पोलिस पाटील, सरपंच यांना सूचना देऊन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य मार्गदर्शन करण्यास सांगावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान करावे अशी मागणीही भागवत देवसरकर केली आहे. 

loading image