esakal | हिंगोलीत शेतकऱ्याने लावली शेतात गांजाची झाडे; शेतकरी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोलीत शेतकऱ्याने लावली शेतात गांजाची झाडे; शेतकरी ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: वसमत तालुक्यातील मरसुळ शिवारात एका शेतकऱ्याने उसामध्ये गांजाची झाडे लावल्याचे शुक्रवारी ता. नऊ आढळून आल्याने कुरुंदा पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला ताब्यात घेतले. वसमत तालुक्यातील मरसुळ येथील शेतकरी पाशूखा दौलतखाँ पठाण यांच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या शेतकऱ्यांने त्यांच्या शेतातील उसात गांजाची दहा झाडे लावल्याचे आढळून आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, फौजदार सविता बोधनकर, जमादार गजानन भोपे, प्रकाश नेवल आदींनी ही कारवाई केली. मंडळाधिकारी शंकर शिंदे तलाठी श्री. वाघीले, कृषी सहाय्यक श्री. लोखंडे आदींनी पंचनामा केला. या बाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

loading image