

Accident
sakal
देगलूर - शहरातील मशिनरी लाईन भागात एका चार चाकी वाहनाने अनेक छोट्या मोठ्या वाहनांना धडक देत शेवटी ते वाहन दुकानात घुसले. यावेळी झालेल्या अपघातात दुकानासमोर फवारणी पंपाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता.१६ रोजी सकाळी देगलूर शहरात घडली.