

वाळूज महानगर : मित्राची कार घेऊन आईला दवाखान्यात नेत असताना तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघांना जोराची धडक देत कार शहर बसला मागून धडकली. ‘हिट ॲण्ड रन’ची ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव फाट्यावर गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.