esakal | परभणी जिल्हा रुग्णालयास कार्डीयाक रुग्णवाहीक उपलब्ध; खासदार संजय जाधव यांच्या हस्ते लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मागील काही वर्षापासून आरोग्य सेवेत अत्याधुनिक व अद्यायावत कार्डीयाक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी असी मागणी येथील जनते मधून होत होती.

परभणी जिल्हा रुग्णालयास कार्डीयाक रुग्णवाहीक उपलब्ध; खासदार संजय जाधव यांच्या हस्ते लोकार्पण

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला खासदार संजय जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून कार्डीयाक रुग्णवाहिका देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पन सोमवारी (ता.पाच) खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील काही वर्षापासून आरोग्य सेवेत अत्याधुनिक व अद्यायावत कार्डीयाक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी असी मागणी येथील जनते मधून होत होती. परभणी जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो गंभीर आजाराचे रुग्ण येत असतात. काही अत्यवस्थ रुग्णांना तातडीने नांदेड किंवा औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवावे लागते. त्यामुळे अद्यायावर रुग्णवाहिका रुग्णालयास हवी होती. साध्या रुग्णावाहिकांतून आता पर्यंत रुग्णांना नेले जात होते. परंतू खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नाने ही रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयास देण्यात आली. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासाठी अद्यायावत रुग्णवाहिकेची नितांत गरज होती. त्यासाठी जनतेतून मागणी देखील होत होती.

हेही वाचा - नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह खासदार व आमदारही चिडीचूप

या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी सन २०१९ - २० च्या खासदार निधीतून जिल्हा रुग्णालयास कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करुन दिली आहे. सोमवारी, ता. ५ एप्रिल रोजी या कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ. प्रकाश डाके, डॉ. बी.टी. धुतमल, डॉ. कल्याण कदम, डॉ. श्री. मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, दीपक बारहाते, गंगाप्रसाद आनेराव, युवा सेना प्रमुख अर्जुन सामाले, उप महापौर भगवान वाघमारे, व्यापारी गोविंद अजमेरा, अतुल सरोदे आदींची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षापासून कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सची परभणीकरांची मागणी होती. ती आता खासदार श्री. जाधव यांनी पूर्ण केल्यामुळे नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image