सावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय

file photo
file photo
Updated on

नांदेड : मोठी बाजारपेठ, उद्योग व व्यापारनगरी तसेच सचखंड गुरुद्वारा असलेल्या शहरावर प्लॅस्टिकचे संकट घोंगावत आहे. भाजी विक्रेते, मुख्य बाजारपेठेतील दुकाने, टपऱ्या, दवाखाने, मोडिकल, उद्योग व हॉटेल्स यातून दररोज मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा मोकळ्या जागेत टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही. त्यामुळे फोटोसेशन पुरते सुरु केलेली ही मोहीम जनजागृतीअभावी तसेच अनिर्बंध प्लॅस्टिक वापर होत असल्याने बारगळल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्या सर्रास ग्राहकांना सहजरीत्या दिल्या जातात. तेल, सुटे दूध घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नाहीत. त्यामुळे हा कचरा साठत जातो. पर्यावरण आणि सर्व सजीवांच्या आरोग्याला प्लॅस्टिक घातक ठरत आहे. प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध आणून पर्यावरण आणि आरोग्य दोन्हीच्या संवर्धनासाठी प्लॅस्टीक बंदीचा कायदा आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकता नसल्याने प्लॅस्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. शासकीय कार्यालये, शाळांपासून महाविद्यालये, विद्यापीठ या सर्व ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचा वापर बंद करणे गरजेचे झाले आहे.

नागरिकांसह सामाजिक संघटनांनी पुढे यावे
कापडी पिशवी हा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. प्लॅस्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही, याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे ते माहीत करून देणे आवश्‍यक वाटते. प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरण, प्राणिमात्रा, जलाशयांतील जीव, गायी व अन्य प्राणी यांची बेसुमार हानी होत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकची अन्य उत्पादनेही इतस्ततः पडली आणि त्यांचा मातीशी संबंध आला तर पाणी झिरपण्याच्या स्वाभाविक व नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येणे, पाणी साचून राहणे, पाण्याचा स्तर असमतोल होणे आणि पर्यायाने त्या-त्या ठिकाणी मातीचा दर्जा खालावणे, असे दुष्परिणाम होतात. रासायनिक घटकांचा मातीवर परिणाम होतो तो वेगळाच. त्यामुळे प्लॅस्टिकचा भस्मासूर थांबविण्यासाठी महापालिकेसोबतच नागरिक आणि सामाजिक संघटनांनी समोर येणे अपेक्षित आहे. 

अशी करता येईल उपाययोजना

  1. शहरात स्वच्छता अभियानाची प्रभावीरीत्या अमलबजावणी करण्याकरिता लोकसहभागाची गरज आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त करण्याकरिता नागरिकांनी प्लॅस्टिक वापर टाळावा. प्लॅस्टिक वापर कायद्याने गुन्हा असून शहरात प्लॅस्टिक बंदी धोरणाची प्रभावी अमलबजावणी व्हावी.
  2. लहान मुले आपल्या सवयी पाहून तसेच अनुकरण करत असतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, अशी शिकवण घरापासून सुरुवात केली पाहिजे. लहान मुलांना जेव्हा चॉकलेट, कॅंडी, बिस्कीटे खाल्ल्यावर त्यांचे रॅपर्स घरातील कचरा डब्यात टाकावे हे कटाक्षाने शिकवावे. शाळेतही विद्यार्थांना घाण, कचरा होणार नाही याबद्दल शिक्षकांनी समजावून सांगितले पाहिजे. तरच ही मुले भविष्यात इतरांना त्याची शिकवण देतील.
  3. भाजी, फळ विक्रेते आजूनही प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर करीत आहे. यावर दंडात्मक कारवाई होणे आवश्‍यक आहे.
  4. प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यासाठी भाजीवाल्यांनी कागदी पिशव्यांमध्ये भाज्या द्याव्यात. मोठ्या मॉल्समध्ये ज्या पद्धतीने जाड पिशव्या पैसे देऊन विकत घ्याव्या लागतात, त्याचप्रमाणे इतर विक्रेत्यांनीही पैसे घेऊन पिशव्या विकत द्याव्यात. जेणेकरून कापडी पिशव्या वापरण्याची सवय नागरिकांना लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com