‘कोरोना’च्या सकंटाकालीन परिस्थितीत ‘आयएमए’ सरसावली

file photo
file photo

परभणी : ‘कोरोना’ विषाणुच्या संकटाचा सामना करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशने पुढाकार घेतला असून रुग्णांच्या अडचणी लक्षात घेऊन परभणी शहरातील महापालिकेच्या तीन रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी कक्ष सुरु करण्यासाठी औषधी व सुरक्षा साहित्य उपलब्ध करुन देण्याची मागणी ‘आयएमए’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

‘कोरोना’ विषाणुमुळे सर्वत्र बंद आहे. संचारबंदी सुरु असल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर इंडियन मेडीकल असोसिएशने मंगळवारी (ता.२४) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. शहरातील खासगी रुग्णालय अत्यावश्यक सेवेंसाठी सुरु आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार खासगी रुग्णालयात अंमलबजावणी सुरु असून लोकांची गर्दी कमी करुन आरोग्य सेवा दिली जात असल्याची माहिती  इंडियन मेडीकल असोसिएशने सांगितले आहे. 

हेही वाचा व पहा - Video : हंगेरीतून तरुणाचे भारतीयांना कळकळीचे आवाहन...
‘कोरोना’चा प्रादुर्भाव पाहता आणि रुग्णांची वाढती संख्या पहाता परभणीत मोठ्या विलगीकरण कक्षाची गरज भासेल. मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणीही आयोजित करावी लागेल. त्यासाठी ‘आयएमए’च्या वतीने डॉक्टरांचे पथक उपलब्ध करुन मदत केली जाणार आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण फिरल्यास रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने निर्देशीत केलेल्या ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर मध्ये आयएमएचे सभासद वैद्यकीय सेवा देतील.

बहुतांष खासगी रुग्णालय हे दाट लोकवस्तीमध्ये असल्याने अशा ठिकाणी स्क्रिनिंग करणे धोक्याचे होऊन रोगाचा प्रसार वाढेल. म्हणून अशा जागा द्यावी जेथे प्रसाराचा धोका कमी असले, अशी मागणी केली आहे.

रुग्णालयात औषधी पुरवठा, सुरक्षा किटस उपलब्ध

शहरातील महापालिकेच्या जांब नाका, इनायत नगर आणि जायकवाडी येथील रुग्णालयात औषधी पुरवठा, सुरक्षा किटस्, दळणवळण उपलब्ध करुन दिल्यास ‘आयएएम’चे सदस्य वेळा ठरवुन बाह्यरुग्ण तपासणी करतील, अशी माहिती या निवेदनात दिली आहे. ‘आयएएम’चे अध्यक्ष डॉ.बापुराव मोरे, उपाध्यक्ष डॉ. पी. डब्लू. शिंदे, डॉ. हमीद करीम, माजी अध्यक्ष डॉ. राजु सुरवसे, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ.केदार खटिंग, डॉ. संदिप कार्ले आदी उपस्थित होते.

हेही वाचा - मानवतमधील ५३ गावात स्थापन ग्रामस्तरीय समिती

उपजिल्हा रुग्णालयात सुविधा द्या
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्हा रुग्णालयासह गंगाखेड, सेलू यासह ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढवुन बाह्यरुग्ण तपासणीस प्राधान्य देण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती डॉ. राजु सुरवसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. तसेच शासनाच्या निर्देशानुसार औषधी दुकानाच्या माध्यमातून फोनवर किरकोळ आजारावर औषधी सांगीतली जाईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा...
वालूरला खासगी डाॅक्टरांच्या ‘लाॅकडाऊन’ 
वालूर : वालूर (ता. सेलू, जि.परभणी) येथील खासगी डॉक्टरांचे गावातील दवाखाने अचानक बंद झाल्याने मंगळवारी (ता.२४) गावातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
वालूर हे गाव सेलू तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे असून या ठिकाणी १० ते १२ खासगी दवाखाने आहेत. परिसरातील जवळपास पंधरा गावातील नागरिकांचा येथील बाजारपेठेशी दैनंदिन संबंध आहे. वालूरचा खासगी डाॅक्टरांनी मंगळवारी (ता.२४) अचानक आपापली दवाखाने बंद ठेवल्याने गावातील व बाहेरून येणारे नागरिक अंचबित झाले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी

कोरोना विषाणूच्या प्रार्दुर्भावामुळे मोठ्या शहरात  स्थलांतर झालेल्यांचा लोंढा ग्रामीण भागात वाढला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व या आरोग्य केंद्राअंतर्गत १४ उपकेंद्रातील असलेल्या गावातील बाहेरुन येत असलेल्या नागरिकांची मोठ्याप्रमाणात नोंद करण्यात येत आहे. तसेच गावातील खासगी दवाखाने अचानक बंद झाल्याने किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होत आहे. गावातील खासगी दवाखाने अचानक बंद झाल्याने लहान मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  नागरिकांची होत असलेले हेळसांड थांबवावी, अशी मागणी  नागरिकांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com