esakal | मानवतमधील ५३ गावात स्थापन ग्रामस्तरीय समिती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘कोरोना’ उपाययोजनेसाठी सात सदस्यीय समिती

मानवतमधील ५३ गावात स्थापन ग्रामस्तरीय समिती

sakal_logo
By
प्रा. किशन बारहाते

मानवत (जि.परभणी) : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रसारावर प्रतिबंध करण्यासाठी व गाव पातळीवर निर्माण होणारे भीतीचे वातावरण दुर करण्यासाठी मानवत तालुक्यातील ५३ गावात सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा आदेश तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी मंगळवारी (ता.२४) दिला आहे.

हेही वाचा व पहा - Video: गांभीर्य नसणाऱ्यांना मिळाला काठीचा प्रसाद
तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार या समितीचे अध्यक्ष सरपंच तर ग्रामसेवक सचिव असतील. पोलिस पाटील, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती या समितीचे सदस्य असतील. ही समिती तालुक्यातील महानगरातून गावात आलेल्या नागरिकांची यादी तयार करणे. यात कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रावर अशा व्यक्तीवर उपचार केला जाईल. जमावबंदीच्या आदेशानुसार गावात  उत्सव, कार्यक्रम, सोहळा साजरा होणार नाही याची दक्षता घेणे, गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रास्तभाव दुकानातून वेळेवर धान्य वाटप करणे आदी कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा ...

हेही वाचा - मराठवाडा पुन्हा संकटात; वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

शाहीन बाग आंदोलन तूर्त स्थगित
जिंतूर (जि.परभणी) :
मागील तीन महिन्यांपासून जिंतूर येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या संविधान बचाव धरणे आंदोलनाला मंगळवारी (ता.२४) तूर्तास स्थगिती देण्यात आली. केंद्र सरकारने पास केलेले सीएए, एनआरसी, एनपीआर हे तिन्ही जाचक  कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील  तहसील कार्यालयासमोर २७ जानेवारीपासून शाहीन-बागच्या धर्तीवर सर्व पक्षीय बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी तसेच कलम १४४ लागू केल्याने मंगळवारी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित  करण्यात आले. याबाबत आंदोलन कर्त्यांच्यावतीने तहसीलदार सुरेश शेजुळ, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निवेदन देण्यात आले. तरी कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर मौलाना तजमुल अहमद खान, मौलाना सिराज नदवी, मौलाना अब्दुल रज्ज़ाक, मुफ़्ती मुसद्दीक, मौलाना मुज़िर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...
हेही वाचा ....

किराणा दुकाना फोडले
जिंतूर (जि.परभणी): जिंतूर शहरातील भगवान बाबा चौकातील एका किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कमसह इतर साहित्य मिळून एकूण अंदाजे तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. वीर सावरकर गल्लीतील रहिवासी कपिल चंद्रकांत चवंडके यांचे भगवान बाबा चौकात चौंडेश्वरी प्रॉव्हिजन्स नावाचे किराणा दुकान आहे. शहरात संचारबंदी लागू असल्याने सोमवारी (ता.२३) दुपारी ते दुकान बंद करून घरी गेले असता  चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील या दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून गल्यातील रोख रक्कम, सुकामेवा मिळून एकूण अंदाजे तीस हजार रुपयांची चोरी केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला. 
 

loading image