भूम - तालुक्यातील सुकटा शिवारात अवैध मुरूम उत्खनन सुरू असताना, घटनास्थळी माजी सरपंच बजरंग गोयकर यांनी फोटो का काढले? म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार शुक्रवारी (ता. ५) वाजता दुपारी घडला. त्यानंतर आज दि. ८ रोजी संध्याकाळी सात आरोपीवर भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.