बीड जिल्ह्यात घरात घुसून तरुणीला मारहाण, दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

एका तरुणीच्या घरात घुसून दोघांनी तरुणीच्या पायावर धारदार कोयत्याने वार करत जखमी केले आहे. या मारहाणीत तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्याची घटना केज (जि. बीड) - शहरातील फुलेनगर भागात मंगळवारी रात्री घडली आहे.

केज (जि. बीड) - शहरातील एका तरुणीच्या घरात घुसून दोघांनी तरुणीच्या पायावर धारदार कोयत्याने वार करत जखमी केले आहे. या मारहाणीत तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्याची घटना फुलेनगर भागात मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पीडिता उपचार घेत असताना पोलिसांना दिलेला जबाब व रुग्णालयातून आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार शुक्रवारी (ता. १) रोजी दोघाजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरातील फुलेनगर येथील निकिता मोहनराव काळे (वय २०) ही तरुणी कला मंडळात नृत्य करून आपली उपजीविका भागवते. ही तरुणी मंगळवारी मावशीच्या घरी असताना दोघेजण घरात घुसले. तिने यापुढे नाचायला जाऊ नये म्हणून दोन्ही पायावर धारदार कोयत्याने वार करून जखमी केले. या मारहाणीत तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जखमी अवस्थेत त्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून केज पोलिस ठाण्यात आकाश बाजीराव चाळक व एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिसळे हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against two persons for breaking into a house and beating a young woman

Tags
टॉपिकस
Topic Tags: