

Pradhan Mantri Awas Yojana
माहूर - माहूर नगरपंचायतीत 2018 ते 2021 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेला दोन कोटी सात लक्ष एक हजार सातशे रुपये निधी लाभार्थ्या ऐवजी इतर खात्यात वर्ग करून अनियमितता करून अपहार केल्याने तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध बुधवारी (ता. 24) रात्री साडेदहा वाजता माहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल झाल्याने माहूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.