बीड - परीविक्षाधिन पोलिस उपाधीक्षकांच्या वाहनाला गोतस्करांकडून धडक देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरात शनिवारी (ता. ३१) दुपारी घडली. गोतस्करी होत असल्याच्या माहितीवरुन वाहन अडविण्याचा प्रयत्न करताना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून एक फरार झाला आहे.