शेंद्रा एमआयडीसीत जनावरे, मांस पकडले

संताेष शेळके
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

बंद अवस्थेतील इमारतीत जनावरांची सुरू असलेली अवैध कत्तल थांबविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. सोमवारी (ता. 12) दुपारी शेंद्रा एमआयडीसीत असलेल्या एका बंद अवस्थेतील इमारतीत सदरील कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी पाच जिवंत जनावरे, रोख एक लाख रुपये, तेरा क्विंटल मांस, कत्तलीसाठी लागणारी शस्त्रे , तीन मोटारसायकल असा एकूण 12 लाख 63 हजारांच्या मुद्देमालासह पंधरा संशयितांना ताब्यात घेतले.

करमाड (जि.औरंगाबाद ) : बंद अवस्थेतील इमारतीत जनावरांची सुरू असलेली अवैध कत्तल थांबविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. सोमवारी (ता. 12) दुपारी शेंद्रा एमआयडीसीत असलेल्या एका बंद अवस्थेतील इमारतीत सदरील कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी पाच जिवंत जनावरे, रोख एक लाख रुपये, तेरा क्विंटल मांस, कत्तलीसाठी लागणारी शस्त्रे , तीन मोटारसायकल असा एकूण 12 लाख 63 हजारांच्या मुद्देमालासह पंधरा संशयितांना ताब्यात घेतले.

या घटनेत अब्दुल वाहिद शेख, शेख तरबेज, इंद्रिस खान नूर खान पठाण, शेख मजीत शेख अकबर, शेख सरफराज शेख मजीत, मोहम्मद अमीन चांद शहा, सय्यद अकबर सय्यद हनीफ, शेख रफीक शेख खुदाबक्ष, शेख आवेज शेख परवेज, शेख जावेद शेख समद, शेख वसीम शेख बुडन, मोहम्मद शापिक बाबा, नासिर शेख बुडन, मजीद बुडन कुरेशी व नासेर शेख बुडन (सर्व रा. वरूड काजी, ता. औरंगाबाद ) या पंधरा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांविरुद्ध गोवंश कायद्यानुसार चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास खबऱ्यामार्फत शेंद्रा एमआयडीसीतील "सी सेक्‍टर' मधील सय्यद अय्युब यांच्या प्लॉट क्रमांक 5/11 मधील बंद असलेल्या इमारतीत काही जण जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापा टाकला. यावेळी या पथकास पंधरा संशयित अवैधरित्या जनावरांची कत्तल करताना दिसून आले. यावेळी पथकाने जिवंत पाच जनावरे, रोख 93000 रुपये, एकूण 13 क्विंटल मांस ज्याची बाजारातील किंमत 3 लाख 12 हजार, जनावरांची कत्तल करण्यासाठी लागणारी शस्त्रे, मोबाईल, तीन मोटारसायकल असा एकूण 12 लाख 63 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक श्री. दुलत, श्री. बावसकर, श्रीमंत भालेराव, श्री. तांदळे यांनी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cattles, Meat sized in shendra midc