coronavirus - बीड जिल्ह्यात गावोगावी घेतली जातेय खबरदारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

शिरूर कासार (जि. बीड) - ग्रामीण भागात पूर्वी स्वच्छता मोहीम केवळ फार्स ठरत होती, परंतु आता स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याचे महत्त्व सर्वानाच पटू लागले आहे. त्यामुळे गावोगावी काळजी घेतली जात आहे.

नगरपंचायतीच्या वतिने कोरोना व्हायरसबाबत खबरदारी घ्यावी यासाठी शहरातील संपूर्ण प्रभागात शनिवारी (ता. २८) जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. 
शहर हे तालुक्याचे ठिकाण असुन येथे १७ प्रभाग आहेत. नगर पंचायतीने कोरोना व्हायरसची खबरदारी घेण्यासाठी जनजागृती करून शहरातील स्वच्छताची मोहीम हाती घेतली आहे.

आमदार सुरेश धस यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेत मुख्याधिकारी नीलम कांबळे, नगराध्यक्ष मीरा गाडेकर, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, माजी नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर, नगरसेवक गणेश भांडेकर, ज्ञानेश्वर उटे, अन्वर शेख, दादा हारीदास, सुनिल शिंदे, आनंद जावळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com