esakal | 'कोरोना विषाणू' लातूरमध्ये येऊच नये म्हणून...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus News Latur

कोरोना संसर्गाची लक्षणे खोकला, ताप, श्वासोच्छ्वासास त्रास अशी सर्वसाधारपणे आहेत. हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरत आहे. हा आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

'कोरोना विषाणू' लातूरमध्ये येऊच नये म्हणून...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर ः कोरोना या विषाणूमुळे न्युमोनियासारखी लक्षणे असलेला आजार असून, कोरोना बाधित क्षेत्रातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये अथवा कोरोना विषाणू रुग्णांच्या संपर्कात आल्यास आजाराची शक्‍यता उद्भवू शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यातून गावपातळीवर देखील सर्दी, ताप, खोकला रुग्णांचे रोग सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाची लक्षणे खोकला, ताप, श्वासोच्छ्वासास त्रास अशी सर्वसाधारपणे आहेत. हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरत आहे. हा आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

हेही वाचा - महिलांनो, अशी घ्या हृदयाची काळजी

या आजारावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना राज्यस्तरावरून आलेल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत. तसेच गावपातळीवर जनतेने काय काळजी घ्यावी यासंदर्भात हस्तपत्रके, पोस्टर, बॅनर्स आदींद्वारे माहिती देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी यांच्याद्वारे सर्दी, ताप, खोकला अशा रुग्णांचे रोग सर्वेक्षण करण्यात येत आहेत.

जिल्हास्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोनासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे सर्वेक्षण अधिकारी या कक्षास दिवसातून दोन वेळेस भेट देऊन त्याबाबतचा अहवाल घेत आहेत. जनतेने घाबरून न जाता सावध राहावे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी व नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. जी. परगे यांनी केले आहे.

क्लिक करा - लातूरच्या या लेखकाचा सन्मान

खबरदारीची उपाययोजना

  • शिंकताना व खोकताना नाकावर रुमाल धरावा
  • साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुवावेत
  • सर्दी किंवा फ्लूसदृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळावा
  • मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावेत
  • जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावा
loading image