esakal | सावधान : सेलूतील दोन मुलींना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मंगळवारी (ता. २३) सकाळी सेलू शहरातील दोन युवतींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आता जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या ९८ वर गेली आहे

सावधान : सेलूतील दोन मुलींना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या रुग्णांची आकडेवारी आवाक्यात आली आहे. या रुग्णांचा रिकव्हरी रेटही चांगला असला तरी मंगळवारी (ता. २३) सकाळी सेलू शहरातील दोन युवतींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आता जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या ९८ वर गेली आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण वाढण्यास चौथ्या लॉकडाऊनपासून सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या तीन लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी यंत्रण मिळविल्याने जिल्हा कोरोना संसर्गापासून दुर होता. परंतू चौथ्या लॉकडाऊननंतर पुणे- मुंबईसह इतर मोठ्या शहरातील स्थलातंरीत लोक परभणी जिल्ह्यात दाखल झाले ते कोरोनाचा संसर्ग घेवूनच. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. 

हेही वाचादिव्यांग सिद्धार्थने रेखाटले ‘या’ अधिकाऱ्याचे रेखाचित्र

जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ९८ वर 

सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणु संसर्गावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार होती. त्यात मंगळवारी दोन रुग्णांची भर पडल्याने ती संख्या आता सहावर गेली आहे. आज पर्यंत ९८ कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर ८९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तीन रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. राज्यात कोरोना रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अधून मधून एक दोन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोना मुक्त परभणी जिल्हा होण्यास अजून वेळ लागणार आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राप्त झालेल्या कोरोना विषाणु संसर्गाच्या अहवालात सेलू शहरातील दोन युवती कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार म्हणावा तितक्या मोठ्या प्रमाणात नसला तरी, नागरीकांनी स्वताची काळजी स्वता घेणे गरजेचे आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी गेल्यास संसर्गातून हा आजार जडण्याची भिती आहे. त्यामुळे नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. दुकाने, कार्यालय व इतर ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा वापर करून स्वत: चा बचाव करावा.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

loading image