
Keij Robbery
Sakal
केज : चार लाख रूपयाची रोख रक्कम पिशवीत ठेवून दुचाकीवरून ऊसतोड मुकादम गावाकडे जात होते. त्यावेळी ऊसतोड मुकादमा हातातील दुचाकीवरून आलेल्या दोघे हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना एक्कोणतीस जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयाजवळ घडली होती. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांना या गुन्ह्याचा तपास करीत असताना शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लुटारूंचा शोध लागण्याचा विश्वास होता. अखेर पोलीसांचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीचा अंदाज खरा ठरून केज पोलीसांनी आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी भागातील दोघांना बुधवारी (ता.१०) परभणी कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले आहे.