
लातूर : शिकवणी परिसरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक
लातूर : लातूर पॅटर्नमध्ये कोचिंग क्लासेसचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. लातूर मधील कोचिंग क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोचिंग क्लास चालविणाऱ्यांनी ट्युशन एरियामध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
शिकवणीसाठी येणारे विद्यार्थ्यांच्या मोटरसायकली व वाहनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने कोचिंग क्लासेस चालकांनी पार्किंगची व्यवस्था करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.येथील पोलिस दलाच्या वतीने ट्युशन एरियातील खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल व मेस चालविणाऱ्यांची बुधवारी (ता. ३) बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ट्युशन एरियातील विविध समस्या तसेच कोचिंग क्लासेस, हॉस्टेल व मेस चालविणाऱ्याच्या शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत चर्चा करण्यात आली.
लातूर पॅटर्नमध्ये कोचिंग क्लासेसचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. लातूर मधील कोचिंग क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोचिंग क्लास चालविणाऱ्यांनी ट्युशन एरियामध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शिकवणीसाठी येणारे विद्यार्थ्यांच्या मोटरसायकली व वाहनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने कोचिंग क्लासेस चालकांनी पार्किंगची व्यवस्था करावी. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्यांना काही समस्या किंवा तक्रार असेल तर थेट पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रचंड ताण असतो. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसनी काही ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांचे सामाजिक व मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलिस निरीक्षक दिलीप डोलारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील, प्रवीण राठोड उपस्थित होते.
Web Title: Cctv Installed In Latur Tuition Area Police Parking Arrangement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..