esakal | Video : टाळ मृंदगाच्या गजरात शिवरायांना अभिवादन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागील अनेक वर्षापासून परभणीत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यंदाही महाराजांच्या पुतळा परिसरातील मैदानात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

Video : टाळ मृंदगाच्या गजरात शिवरायांना अभिवादन

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : ज्ञानोबा- माऊली- तुकाराम, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा, बाल वारकऱ्यांचा भक्तीचा निनाद, कपाळी भगवा टिळा, हाती भगवा झेंडा अशा भगवेमय वातावरणातपरभणीत अखिल भारतीय वारकरी मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही
शिवजयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर टाळ मृंदगाच्या गजरात रिंगण करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागील अनेक वर्षापासून परभणीत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यंदाही महाराजांच्या पुतळा परिसरातील मैदानात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकाळी  सदगुरु बालासाहेब महाराज पौळ यांचे हरिकिर्तन झाले. व्यसनमुक्ती, हुंडाबळी, बेटीबचाव, बेटीपढाव, वृक्ष लागवड, पाणी आडवा, पाणी जीरवा, प्लास्टीक बंदी, अंधश्रध्दा निर्मुलन आदीं विषयावर भजन, भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. 


हेही वाचा -...चक्क स्मशानभूमीत व्यायाम ! ​

पुरस्काराचे वितरण 
या वेळी खासदार संजय जाधव यांना वारकरी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श माता पुरस्कार श्रीमती पंचफुलाबाई बापुराव घोडके, कुशल प्रशासक -जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, गोमाता पुरस्कार-कृष्णकांत अष्टेकर पुणे, गायनाचार्य पुरस्कार पंढरीनाथ कदम, आयुर्वेदाचार्य पुरस्कार डॉ. गणेश देशमुख यांना सन्मानीत करण्यात आले. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, महापौर अनात सोनकांबळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अच्युत महाराज दस्तापुरकर, संयोजक बालासाहेब महाराज मोहीते, राम महाराज काजळे, राम महाराज मिरखेलकर आदी उपस्थित होते. 

मिरवणुकीत हरिनामाचा गजर
महिला आणि पुरुष वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या रिंगणानंतर वारकऱ्यांची मिरवणुक वसमत रस्त्याने जात खानापूर फाटा येथील वारकरी शिक्षण संस्थेत विसावली. याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मिरवणुकीत टाळ मृंदागाचा गजर,हरिनामाचा जयघोष करत महिला,पुरुष,बालके सहभागी झाली होती.तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.

हेही वाचा - शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर ..

loading image