रमजान ईद घरीच साजरी करा- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुचेश जयवंशी

रमजान ईद घरीच साजरी करा- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली : रमजान ईदचा सण सार्वजनिक (Eid) ठिकाणी साजरा न करता घरीच साजरा करुन ब्रेक द चेन नियमांचे (Brake the chain) पालन करण्याचे आदेश मंगळवारी (ता. ११ ) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Hingoli collector jaiwanshi) यांनी काढले आहेत. (Celebrate Ramadan Eid at home - Collector Ruchesh Jayavanshi)

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता गुरुवारी (ता. १३) किंवा शुक्रवारी ( ता. १४) ( चंद्रावर अवलंबून ) रोजी साजरा करण्यात येत असलेल्या रमजान ईदच्या कालावधीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे. त्याअर्थी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत रमजान ईद साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - मंगळवारी ( ता. ११ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी निकाळजे हे आपल्या वाहनातून नरवाडी परिसरातून जात असतांना अचानक त्यांच्या गाडीवर अज्ञात रेती माफियांनी हल्ला केला.

रमजान ईद निमित्त घ्यावयाची काळजी व उपाययोजना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येत सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल, नमाज पठणाकरीता मशिदीत, मोकळ्या जागेत अथवा इदगाह या ठिकाणी एकत्र येऊ नये सामान खरेदी करण्या करीता या कार्यालयाच्या आदेशानुसार दिलेल्या वेळेमध्येच करावे. सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, कोवि ड- १९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कलम ४५ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.

रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनीटायझरचा वापर करण्या बाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या आदेशातील सूचनाचे नागरिकांनी ततोतत पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी आदेशात नमूद केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे