Phulambri News : फुलंब्रीच्या विकासाला केंद्राचा २.५२ कोटींचा बूस्टर..! पालफाटा ते देवगिरी कारखाना परिसरापर्यंत महामार्ग उजळणार; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश..!

फुलंब्री शहराच्या विकासाला चालना देणारी मोठी मंजुरी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मिळाली आहे.
mla anuradhatai chavan

mla anuradhatai chavan

sakal

Updated on: 

फुलंब्री - शहराच्या विकासाला चालना देणारी मोठी मंजुरी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मिळाली आहे. फुलंब्री शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील विशेष दुरुस्ती, दुभाजकांची उभारणी, सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण आणि रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी एकूण २ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील कामांसाठी १ कोटी ६१ लाख रुपये, तर पाल फाटा -फुलंब्री-खुलताबाद महामार्गावरील रस्ता सुरक्षा कामांसाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी या कामांसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

Loading content, please wait...