
येरमाळा : येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा १२ ते १७ एप्रिल दरम्यान होत असुन मुख्यचुना वेचण्याचा कार्यक्रम रविवारी (ता.१३) होणार असून या कार्यक्रमासाठी दरवर्षी पंधरा लाखाच्यावर भाविक दाखल होतात. त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये,कायदा सुवस्था,आभादीत राखून भाविकांच्या सूरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाने तयारी केली आहे.