पुन्हा अमित देशमुख यांचा स्वबळाचा नारा | Chakur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री अमित देशमुख
देशमुख यांचा स्वबळाचा नारा

पुन्हा अमित देशमुख यांचा स्वबळाचा नारा

sakal_logo
By
किरण महानवर

चाकूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितले होते, यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात पडले असताना पुन्हा एकदा चाकूर येथे पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात श्री. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे प्रदेश चिटणीस अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे संचालक एन. आर. पाटील, रामराव बुदरे, विजय निटुरे, सांब महाजन, चंद्रकांत मद्दे यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांनी प्रास्ताविकातून तालुक्यातील पक्षाच्या कामाची माहिती दिली.

हेही वाचा: शेगाव : ‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’

जिल्हा बँकेच्या संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल एन. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निश्चीत करून त्यांना काम करण्यास लावावे व पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणूक आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष पप्पुभाई शेख, भागवत फुले, नीलेश देशमुख, सलीम तांबोळी, गंगाधर केराळे, सीताराम मोठेराव, मोहनराव पाटील, सुरेश मुंडे, अॅड. धनंजय कोरे, बाळू इरवाने, शमीम कोतवाल, लता चांडसुरे, हरीश चव्हाण, शिवकुमार गादगे, गफूर मासुलदार, रणजित पाटील, मोहन कुलकर्णी, नागनाथ बेजगमवार, पद्माकर जोशी, डॉ. शांतिलाल सोनी, डॉ. पुंडलिक चाटे, रियाज पठाण, खदीर शेख आदी उपस्थित होते.

loading image
go to top