esakal | उस्मानाबादसह लातूर व नांदेडमध्ये पावसाची शक्यता; हवामान शास्त्र विभागप्रमुख
sakal

बोलून बातमी शोधा

हवामान अंदाज

उस्मानाबादसह लातूर व नांदेडमध्ये पावसाची शक्यता; हवामान शास्त्र विभागप्रमुख डाखोरे

sakal_logo
By
गणेश पांंडे

परभणी ः पुढील तीन दिवस उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. कैलास डाखोरे यांनी सोमवारी (ता. तीन) दिली.

परभणी जिल्ह्यास संपूर्ण मराठवाड्यात आगामी ता. आठ मेपर्यंत वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. त्यानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. आगामी ता. सात मेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार ता. चार मे रोजी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व नांदेड या तीन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकाऱ्याची नितांत गरज - अशोक चव्हाण

ता. सहा मे रोजी परत याच उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ता. सात मे रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आगामी चार दिवसात शेतकऱ्यांनी व सर्व सामान्य नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये. पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image