तीन जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता

file photo
file photo
Updated on

परभणी : मराठवाड्यातील परभणीसह उस्मानाबाद, नांदेड या तीन जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत १३ ते १७ मे दरम्यान, आकाश ढगाळ राहून पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम कृषी विभागाने दिली आहे.

मराठवाड्यात मागील चार दिवसांपासूनढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.  मराठवाड्यात शनिवारी (ता. नऊ) वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी विजादेखील पडल्या आहेत, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागा, शेतआखाडे, पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही ढगाळ वातावरण कायम असून पुढील पाच दिवसांत आकाश ढगाळ राहून उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

पिकांची अशी घ्या काळजी 
दरम्यान, काढणीस तयार असलेल्‍या उन्‍हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्‍यावी. सध्‍याच्‍या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळविणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्‍यावीत. केळी वाढीची अवस्‍था केळी बागेत खोडांना मातीचा आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी, यामुळे कलमांची मर होणार नाही. तसेच बागेत जैविक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी पाणी द्यावे. परिपक्‍व झालेल्‍या व काढणी न केलेल्‍या आंबा फळांची काढणी करून घ्‍यावी. आंबा फळांची काढणी देठासहीत करावी जेणेकरून फळांचे काढणी पश्‍चात आयुष्‍य वाढून पक्‍वता एकसारखी होण्‍यास मदत होते, असे कृषी विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.
 
हेही वाचा : लॉकडाउनने भट्टीच पेटली नाही; कुंभार व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

 परभणीच्या तापमान वाढ
ढगाळ वातावरणामुळे परभणीत तापमान ४४ अंशांवरून ३९ अंशांवर घसरले होते. परंतु, चार दिवसांपासून परभणीत ढगाळ वातावरण तयार होत आहे. मंगळवारी (ता. १२) मात्र, दुपारपर्यंत लख्ख सूर्यप्रकाशदेखील पडला होता. परंतु, दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. अशा वातावरणातदेखील उकाडा प्रचंड होता. तापमानदेखील ४१.०२ अंशांवर पोचले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Maratha Quota
Marathi News Esakal
www.esakal.com