Video : शंक्या...! काहीही व्हायलय बे हे....; अभिनेता संकर्षण यांची परभणी तडका कविता

file photo
file photo

परभणी : मराठावाड्यातील बोली भाषा ही संबंध महाराष्ट्रात ओळखली जाते. त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यातील अस्सल गावराणी भाषेने तर सर्वांनाच वेड लावले आहे. याच अस्सल परभणी तडका भाषेत सुप्रसिध्द अभिनेता तथा परभणीचा सुपुत्र संकर्षण कऱ्हाडे याने शंक्या...! काहीही व्हायलय बे हे.... ही कविता सादर केली. त्याने ही कविता अभिनेत्री स्पृहा जोशी हिला व्हिडिओ कॉलवरून ऐकविली. याच व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सध्या संपूर्ण मराठवाड्यातील सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

परभणी ही जशी संताची भूमी तसेच या भूमीने दिग्गज कलावंतांनाही जन्म दिला आहे. परभणीत जन्म घेतलेले अनेक जन आज मराठी रंगभूमीच्या माध्यमातून हजारो चाहत्याच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला तरूण व सुप्रसिध्द अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा आहे. कधी काळी परभणीच्या काद्राबाद प्लॉट भागातून लाल चड्डी व पांढऱ्या रंगाच्या शर्ट घालून, पाठीवर पुस्तकाची बॅग लटकवून मित्रासोबत हसत - खेळत गल्लीबोळातून शाळेला जाणारा हा संकर्षण आज सेलिब्रेटी बनला आहे. लहानवयापासूनच विनोदी स्वभावाचा संकर्षण पुढे चालून रंगभूमी व मराठी चित्रसृष्टीतील सतत चमकणारा हिरा बनले असे कुणालाही वाटले नसावे. आज ही संकर्षण जेव्हा परभणीत येतो तेव्हा त्याला अरे शंक्या....! अशी हाक मारणारे त्याचे बालमित्र गल्लीबोळातून दिसतात. स्वताच्या कर्तुत्वाचा कुठलाही गर्व न करता तो देखील त्याच आवाजात मित्रांना साद देवून गप्पात रंगतो.

कविता मित्राच्या संभाषणाची 
अभिनयाच्या क्षेत्रात उच्च शिखरावर पोहचलेल्या या परभणीच्या लेकांच्या अंगात कवी सुध्दा दडलेला आहे. दीड ते दोन महिण्यापासून तो टाळेबंदीमुळे मुंबईतील घरातच आहे. या टाळेबंदीचा सदुपयोग करून त्याने चांगल्या-चांगल्या कविता रचलेल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याने त्या श्रोत्यांपर्यंत पोहचविल्या देखील. नुकताच त्याचा व अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड व्हिडिओ मंगळवारी (ता.१२) परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि काही मिनिटाच्या कालावधीतच तो सर्वांच्याच पसंतीस उतरला. त्याच कारण एकच होत की ती कविता संकर्षणच्या परभणीतील मित्र सुरेश याच्या व त्यांच्यात झालेल्या संभाषणाची होती. त्या कवितेच्या ओळी अस्सल परभणीच्या भाषेत सादर करण्यात आल्या होत्या. 
हेही वाचा :​ औरंगाबादला कोरोनाने वेढले आज २४ पॉझिटिव्ह, @६५१ -
अशी आहे त्याची ही कविता...

शंक्या काही ही व्हायल बे हे...
त्या वुहान मध्ये कुणी वाटवाघूळ खायलाय
त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय..
ट्रम्प म्हणतय ते चीन मुद्दाम करालाय..
खरी माहिती ते तर लपून ठेवायलाय
गोपनीय सुत्र काही वेगळच सांगायलाय
अमेरिकाच म्हणे त्याला पैसाच पुरवायलाय
अरे त्या वटवाघूळालाच म्हणाव तु खरी माहिती दे
शंक्या काहीही व्हायलय बे हे...
बर प्रत्येकाचा करोना वेगळाच निघायलाय
कुणी खोकायलाय कुणी नाकच पुसायलाय
दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून
पॉझीटीव्ह निघायलाय..
जो पेशंटये तो पळून काय चाललाय
कॉरन्टाईनचे शिक्के पुसुन काय टाकायलाय
पोलिसांना मारूण व डॉक्टरवर थुकून
बर होणार रे का ते..
शंक्या काही ही व्हायलय बे हे....

(पूर्ण कवितेसाठी पहा व्हिडिओ)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com