Shiv Jayanti : ‘या’ शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुक मार्गात बदल...कसा तो वाचा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान वाहतुक खोळंबा होऊन कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घेत शहरातील वाहतुक व्यवस्था बदलण्यात आली आहे.

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बुधवारी (ता. १९) होणाऱ्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान वाहतुक खोळंबा होऊन कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घेत शहरातील वाहतुक व्यवस्था बदलण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या मार्गाचा वाहनधारकांनी वापर करून पोलिस विभागाला सहकार्य करावे असे आवाहन शहर वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. 

बुधवारी (ता. १९) शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुका व शोभायात्रा मुख्य रस्त्यावरून निघणार असल्याने वाहनांची कोंडी होण्याची शक्यता असते. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतुक विभागाच्या वतीने एक दिवसासाठी वाहतुक मार्गात तात्पुरता बदल केला आहे. शहरातील पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देण्यात यावे व तसे आदेशीत करण्यात यावे जेणेकरून वाहुतकीस अडथळा निर्माण होणार नाही. अशा सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी वाहतुक शाखेला दिल्या आहेत. 

हेही वाचाधक्कादायक- का केला आई- वडिलावर मुलाने चाकुने हल्ला...वाचा

हे आहेत वाहतुकीसाठी बंद मार्ग

ँ जुनामोंढा, देना बॅक, महाविर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदीर, शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंत जाण्या येण्यास बंद. 
ँ राज कॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राजकॉर्नर, वर्कशॉप टी पॉईन्ट,  श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू बंद.
ँ बर्की चौक ते जुना मोंढ्याकडे येण्यासाठी बंद.
ँ सिडको, हडको ते जुनामोंढ्याकडे येण्यासाठी बंद.  

वाहतुक वळविण्याचे ठिकाण व मार्ग

ँ बर्की चौकाकडून जुना मोंढ्याकडे येणारी वाहतुक महमद अली रोड जाण्या- येण्यासाठी वापर करतील. 
ँ वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजिराबाद चौक, पोलिस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर ( पीवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईन्टकडे जाण्या- येण्यासाठी वापर करतील. 
ँ राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक राजकॉर्नर, व्रकशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जूना टी पॉईन्ट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्री निवास पोलिस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या- येण्यास वापर करतील. 
ँ गोवर्धन घाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतुक पोलिस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पीवळी गिरणी) ते गणेशनगर वायपॉईन्टकडे जाण्यासाठी वापर करतील. 
ँ सिडको व हडकोकडून येणारी वाहतुक साईकमान, गोवर्धनघाट नविन पुल, तिरंगा चौक पोलिस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर ( पीवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईन्टकडे जाण्यासाठी वापर करतील. 
या सुचनांचे पालन करत मोटार वाहनचालक- मालक व जनतेनी वरील मार्गाचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in transport route for Shiv Jayanti in 'this' city ... Read how nanded news.