esakal | निलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

3nilesh_20rane_2

सोशल मीडियावर द्वेषभाव निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने बीड जिल्ह्यातील केज येथील पोलिस ठाण्यात निलेश राणे यांच्यासह दोघा जणांविरोधात रविवारी (ता.११) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : सोशल मीडियावर द्वेषभाव निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने बीड जिल्ह्यातील केज येथील पोलिस ठाण्यात निलेश राणे यांच्यासह दोघा जणांविरोधात रविवारी (ता.११) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर द्वेषभाव निर्माण होईल असा संदेश   निलेश राणे (रा.कणकवली),  विवेक आंबाड (रा.लाडेगाव, ता.केज) व रोहन चव्हाण (रा.पळसखेडा, ता.केज) यांनी पाठविल्याचे  वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांना नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या भ्रमणध्वनीत व्हॉटसअपमध्ये संदेश पाहत असताना दिसून आले.

दोन चोरट्यांना अटक, दीड लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त

या प्रकरणी केज येथील पोलिस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांच्या तक्रारीवरून निलेश राणे यांच्यासह विवेक आंबाड, रोहन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे करत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर