बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्यासह आठ जणांवर आज येथील विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले..कट करून संगनमताने खून, खंडणी, जातिवाचक शिवीगाळ, पुरावे नष्ट करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. आरोप निश्चितीसाठी एक वर्षाचा कालावधी लोटला. आज २३ व्या सुनावणीत दोषारोप निश्चिती झाली. पुढील सुनावणी आठ जानेवारी २०२६ ला होणार आहे.सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा (ता. केज) जवळून नऊ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणासह अवादा कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी, याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावर भांडण, तेथील सुरक्षा रक्षकाला जातिवाचक शिवीगाळ असे वेगवेगळे तीन गुन्हे केज पोलिस ठाण्यात दाखल झाले..राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाने तपास करून वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांच्यावर कट करून खून, खंडणी, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवला. यातील कृष्णा आंधळे अद्याप फरारी आहे. उर्वरित आरोपी तुरुंगात आहेत..या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. यापूर्वीच्या तीन सुनावण्यांत दोषारोप निश्चितीसाठी आरोपींच्या वकिलांकडून विविध कारणांनी वेळ वाढवून घेतला जात होता. आजच्या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) आरोपींना हजर करण्यात आले.त्यांच्यावरील आरोप न्या. पटवदकर यांनी वाचून दाखविले. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुनावणीवेळी हजर होते. ‘‘आरोप निश्चित झाल्याबद्दल समाधान आहे. आरोपींना लवकर फाशीची शिक्षा व्हावी’’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..फक्त ‘हो’, ‘नाही’ उत्तर द्यातुरुंगातून ‘व्हीसी’द्वारे हजर आरोपींना त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवून, ‘मान्य आहेत का नाही’, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावेळी मुख्य सुत्रधार वाल्मीक कराडने बोलायचे आहे, अशी विनंती केली. यावर, न्यायाधीशांनी फक्त ‘हो किंवा नाही’ एवढेच उत्तर देण्याची सूचना केली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सहायक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे तर बचाव पक्षाकडून अॅड. दिग्विजय पाटील, विकास खाडे, अॅड. अनिल बारगजे उपस्थित होते..प्रत्येक आरोपींचा स्वतंत्र वकीलया हत्याकांडातील चौथ्या क्रमांकाचा आरोपी सुधीर सांगळे याच्याकडून आजच्या सुनावणीसाठी अॅड. अनिल बारगजे सहभागी झाले. त्यांनी या प्रकरणातील पेनड्राइव्हची मागणी करून त्यासाठी न्यायालयाकडे वेळ देण्याची मागणी केली. त्यावर, यापूर्वीच्या वकिलांना सगळे पुरावे दिल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक आरोपीकडून स्वतंत्र वकील असेल का, अशी विचारणा न्यायालयाने आरोपींना केली. त्यावर सर्वांनी ‘हो’ असे उत्तर दिले..कराडतर्फे दोषमुक्तीचा अर्जछत्रपती संभाजीनगर : ‘सरपंच देशमुख यांच्या हत्येशी माझा संबंध नाही, गेल्या दहा वर्षांत गुन्हे दाखल नाहीत, त्यामुळे ‘मकोका’ लावता येत नाही’ या मुद्द्यावर वाल्मीक कराड याने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे.त्यावर मंगळवारी (ता. २३) न्या. संदीपकुमार मोरे, न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीचे वकील उपस्थित नसल्याने खंडपीठाने पुढील सुनावणी १५ जानेवारीला ठेवली आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. झेड. एच. फारुकी, ॲड. धनंजय पाटील यांनी काम पाहिले..जाणीवपूर्वक उशीरविशेष सरकारी वकील अॅड. निकम म्हणाले, ‘या प्रकरणात आरोपींकडून वेगवेगळे हातखंडे वापरून उशीर करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आजच्या दोषारोप निश्चितीमुळे त्याला चाप बसला. वकील बदलण्याचा अधिकार असला तरी वेगवेगळ्या माध्यमांतून दरवेळी खटला लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार मुंबई बाँबस्फोट प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपींकडून केला गेला होता.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.