
मधुकर कांबळे
छत्रपती संभाजीनगरातील वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशनच्या सेवेकऱ्यांकडून आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांना गूळ, शेंगदाण्याचे लाडू आणि पुरणपोळीची पंगत दिली जाते. ‘माझा एक तरी लाडू, माझ्या पांडुरंगाला’ हा उपक्रम मनोज सुर्वे गेल्या १७ वर्षांपासून राबवित आहेत. यंदाचे हे १८ वे वर्ष आहे.