धर्माबादेत ७०० लिटर हातभट्टी जप्त

सुरेश घाळे
Saturday, 4 April 2020


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. दारू, विदेशी दारू दुकानेही बंद आहेत. मद्याविक्रीची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची गैरसोय होत आहे. दरम्यान दारुड्यानी हातभट्टी दारूकडे मोर्चा वळवला आहे.

धर्माबाद, (जि.नांदेड) ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. मात्र तालुक्यातील धानोरा तांडा येथील शिवारात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर शनिवारी (ता.चार) दुपारी अडीच वाजता पोलिसांनी धाड टाकली. येथून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७०० लिटर ज्याची किंमत ७० हजार रुपयांची हातभट्टी दारू जप्त करून त्या दारूची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

 

तळीरामांची गैरसोय
सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त असून भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. दारू, विदेशी दारू दुकानेही बंद आहेत. मद्याविक्रीची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची गैरसोय होत आहे. दरम्यान दारुड्यानी हातभट्टी दारूकडे मोर्चा वळवला आहे. तालुक्यातील धानोरा तांडा येथील शिवारात दिवसाढवळ्या अवैधरित्या हातभट्टी दारू सर्रासपणे विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

 

हातभट्टी दारू उध्वस्त
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी अडीच वाजता तालुक्यातील धानोरा तांडा शिवारातील हातभट्टी दारू अड्डयांवर करखेली बिट पोलिसांनी धाड टाकली. या वेळी आरोपी बाबू गोपा चव्हाण (२०० लिटर दारू), अविनाश रायभान राठोड (१०० लिटर दारू), गोविंद हरी चव्हाण (२०० लिटर दारू), भीमराव हरी चव्हाण (२०० लिटर दारू) आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७०० लिटर ज्याची किंमत ७० हजार रुपयांची हातभट्टी दारू उध्वस्त करून विल्हेवाट लावण्यात आली आहे.

हेही वाचा - पंतप्रधान सहाय्यता निधीला दिला ५१ हजाराचा धनादेश

ही कारवाई करखेलीचे बिट जमादार श्यामसुंदर भवानगिरकर, पोलीस हे. कॉ. सूर्यकांत नागरगोजे, पोलीस नाईक श्याम गिरी, दत्ता ढगे आदींनी केली आहे. बिट जमादार श्यामसुंदर भवानगीरकर यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना दरम्यान अवैध हातभट्टी दारू विक्रीचा भीमराव चव्हाण याच्यावर दुसरा तर गोविंद चव्हाण याच्यावर तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charity recovers 700 liters of alcohol, nanded news