

गोंदी (ता. अंबड) : समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मळी व रसायनयुक्त पाणी गोदावरीच्या पात्रात आल्याने नदीपात्रातील हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. ११) पात्रातील संपूर्ण पाण्याचा रंग काळा होऊन काठावर मृत माशांचा खच पडला होता. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे.