Chh. Sambhajinagar : नवीन राजकीय समीकरणे MIMच्या पथ्यावर; मतांच्या फाटाफुटीत लागू शकते लॉटरी

Chh. Sambhajinagar mim
Chh. Sambhajinagar mim

छत्रपती संभाजीनगर : नव्याने उदयास आलेल्या राजकीय समीकरणाचे शहरासह, जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहे. जिल्ह्यात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढती झाल्यास मतांची फाटाफुट एमआयएमच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

Chh. Sambhajinagar mim
Central Railway : मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट! वाहतुकीतून ६७.७७ कोटी रुपयांची कमाई!

एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवेसना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर दुसरीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत बीआरएस, वंचित बहुजन आघाडी, बसपा, आप, निवडणुक लढल्यास मनसे अशा पक्षांची निवडणुकीच्या मैदानात गर्दी झाल्यास मतांच्या फाटाफुटीचा फायदा एमआयएमला छत्रपती संभाजीनगर मध्य आणि पुर्व विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात निर्माण झालेल्या नवीन समीकरणात जिल्ह्याचे राजकीय चित्र सुद्धा बदलत आहे. अगोदरच शिवसेनेतील फुटीमुळे जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात गेले शिवसेनेच्या गडाला खिंडार पडले आता राष्ट्रवादीच्या फुटीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहे. आता एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशी लढाई होत असतांना त्यात फायदा उचलण्यासाठी एमआयएमकडून प्रयत्न सुरु झाले आहे.

मतांच्या फाटाफुटीचा मध्य मध्ये मिळाला होता लाभ

छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामधील मतांच्या फाटाफुटीची फायदा हा एमआयएमला झाला आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची फाटाफुट झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांना त्यावेळी ६१ हजार ८४१ मते पडली. दुसऱ्या क्रमांकवरील शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार ८६१, भाजपचे किशनचंद तणवाणी यांना ४० बजार ७७० मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद पाटील यांना ११ हजार ८४२ मते मिळाली.

Chh. Sambhajinagar mim
Samarjeet Ghatge: समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू

या मतांच्या फाटाफुटीचा सर्वाधिक फायदा एमआयएमला झाला आणि पहिल्या फटक्यात त्यांचा आमदार विजयी झाला. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे किशनचंद तनवाणी यांच्या मतांचा एकत्रित आकडा हा ८२ हजारांच्या जवळपास होता. मात्र २०१९ मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढण्यानंतर येथून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विजयी झाले.

त्यांना ८२ हजार २१७ तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ६८ हजार ३२५ मते मिळाली होती. वंचितचे अमित भुईगळ यांना २७ हजार ३०२ मते मिळाली होती. येथे मतांची फाटाफुट न झाल्याने एमआयएम पराभुत झाली येथे उलट त्यांना वंचित सोबत नसल्याचा फटका बसला. आता पुन्हा महाविकास आघाडी आणि महायुती सोबत इतर पक्षांमध्ये मतांची फाटाफुट झाल्यास छत्रपती संभाजीनगर मध्य मध्ये एमआयएमला विधासभेत फायदा नाकारत येत नाही.

पुर्व विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर

छत्रपती संभाजीनगर पुर्व विधानसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत भाजप आणि एमएमआयएमध्ये टक्कर झाली. २०१४ मध्ये भाजपचे अतुल सावे यांना ६४ हजार ५२८ मते मिळाली होती तर एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांना ६० हजार २६८ मते मिळाली होती. येथे अतुल सावे यांचा फक्त ४ हजार २६० मतांनी विजय झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे अतुल सावे यांना ९३ हजार ९६६ तर एमआयएम चे डॉ. गफ्फार कादरी यांना ८० हजार ३६ मते मिळाली होती. येथे अतुल सावे हे १३ हजार ९३० मतांनी विजयी झाले होते. आता आगामी निवडणुकीत मतांची फाटाफुट झाल्यास येथे एमआयएमसाठी लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पश्‍चिम मध्ये गणित कुणाच्या पथ्यावर

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये सध्या तरी एमआयएमसाठी अनुकुल वातावरण नाही. मात्र आगामी निवडणुकीत मतांची फाटाफुट झाल्यास येथे काट्याची टक्कर होऊ शकते. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे शिवसेनेचे संजय शिरसाट यांना ८३ हजार ७९२ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष राजु शिंदे यांना ४३ हजार ३४७, एमआयएमचे अरुण बोर्डे यांना ३९ हजार ३३६ तर वंचितचे संदीप शिरसाट यांना २५ हजार ६४९ मते मिळाली होती. यामध्ये आता महाविकास आघाडी, महायुती, बीआरएस, वंचित, बसपा, आप तसेच अपक्ष आणि इतर पक्ष अशी भर पडल्यास मतांच्या फाटाफुटीत काट्याची लढत होईल.

लोकसभा निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीत लागली होती लॉटरी

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतांची फाटाफुट झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. त्यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५०, अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८, काँग्रेसचे सुभाष झांबड यांना ९१ हजार ७९० मते पडली होती. या मतांच्या फाटाफुटीत इम्तियाज जलील हे ४ हजार ४४९२ मतांनी विजयी झाले होते. जर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, बीआरएस, आप, वंचित तसेच इतर पक्ष मिळून चौरंगी, पंचरंगी लढत झाल्यास यामध्ये पुन्हा एकदा काट्याची लढत होऊ शकते. तसेच राजकीय समीकरणे अशीच राहिल तर आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएमला मुस्लिम बहुल प्रभागात फायदा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com