Samarjeet Ghatge: समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू

मुश्रीफांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर घाटगेंनी नॉट रिचेबल होत भाजपला इशारा दिला होता.
Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatgeesakal

कागलचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळं कोल्हापुर ग्रामीणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुश्रीफांविरोधात भाजपकडून लढण्यास तयारी करुन बसलेले कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नॉट रिचेबल झाले होते.

तसेच आपण कुटुंबियांशी चर्चा करुन लवकच निर्णय जाहीर करु असं म्हणत भाजपला इशारा दिला होता. यानंतर आज समरजितसिंह घाटगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर केली. (Samarjeet Singh Ghatge announced his role on Kolhapur Kagal Politics)

Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
Kagal Politics : समरजित घाटगे भाजपची साथ सोडणार? मुश्रीफांच्या मंत्रिपदाने नाराज; आज जाहीर करणार भूमिका

भाजपच्या कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज आहेत. कागलमधून आपण हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणुक लढवणार आणि जिंकणार अशी घोषणा घाटगे यांनी केली. कागलमध्ये त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या सभेला शेकडो कार्यकर्ते हजर होते. दोनच दिवसांपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावरुन आपण भाजपतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
Supreme Court: शिक्षण संस्थामधील जातीवाद संपविण्यासाठी तुम्ही काय केले? सुप्रीम कोर्टानं UGC ला मागितली माहिती

घाटगे म्हणाले, "मी येतानाच गुलाबी कुर्ता घालून आलो आहे. त्यामुळं मी आज इथं घोषित करतो की, आपल्या विजयाचं भूमिपुजन इथं झालेलं आहे. आमदारकी नुसती लढणारच नाही तर रेकॉर्ड मार्जिननं जिंकणार. राज्यात ज्या काही घडामोडी झाल्यात एकदम करेक्ट झाल्यात. आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे की, ऑक्टोबर २०२४ला रेकॉर्ड मार्जिननं कागलचा कोंढाणा परत घ्यायचा. उद्यापासून कागलच्या परिवर्तनासाठी कामाला लागा. परिवर्तन झालंय आता सर्वांनी मार्जिन ठरवा कागलचा कोंढाणा आपण घेऊ"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com