

Unidentified Man’s Body Found in Canal at Indegaon
Sakal
अनिल गाभुड
विहामांडवा : इंदेगाव (ता. पैठण) शिवारात शनिवारी (ता. १३ डिसेंबर २०२५) दुपारच्या सुमारास कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. इंदेगाव येथील पोलीस पाटील शिखा रंगनाथ हुबे (वय ३५) यांना दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गावातील निवृत्ती सखाराम पोकळे यांनी फोनद्वारे माहिती दिली की उध्दव द्वारकादास नवथर यांच्या शेताजवळील कालव्यात एक पुरुष मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसत आहे.