Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या (PMDKY) अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव करण्यात आला.
chhatrapati sambhajinagar District Honored in Delhi for Performance in PM Dhan Dhanya Krishi Yojana

chhatrapati sambhajinagar District Honored in Delhi for Performance in PM Dhan Dhanya Krishi Yojana

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या (PMDKY) अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सोमवारी (ता. १२) नवी दिल्ली येथील पूसा परिसरातील एनएएससी कॉम्प्लेक्स येथे सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी यज्ञेश कातबने उपस्थित होते. या सन्मानामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com