

Animal Fodder Shortage in Chhatrapati Sambhajinagar Jowar Straw Costs 50 Rupees Amid Drought Concerns
esakal
-बाळासाहेब काळे
करमाड : पावसाअभावी ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट गडद होत असताना आता पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार लाख ७३ हजार ५६८ जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मागील वर्षी साठवून ठेवलेला वाळलेला चारा संपत आला असून, उपलब्ध चाऱ्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीच्या एका पेंढीचा दर ५० रुपयांवर पोहोचल्याने जनावरांचे संगोपन करताना शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे शासनाने चारा छावण्या सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.