Water Supply Scheme : छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश यांनी केली पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी..

पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजना अंतर्गत बिडकिन व परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी आज दि. १४ रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश यांनी केली.
Water Supply Scheme : छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश यांनी केली पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी..

- रविंद्र गायकवाड

बिडकिन - जायकवाडीतुन ते छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजना अंतर्गत बिडकिन व परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी आज दि. १४ रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचे काम मोठ्या प्रगतीपथावर सुरू असुन याबाबत विविध कामाची पुर्णत्वाची लेखी हमी कंत्राटदारांनी बुधवारी न्यायाधीश रविंद्र घुगे व न्यायाधीश खोब्रागडे यांना खंडपीठात सादर केली आहे.

त्यानुसार नवीन योजनेच्या माध्यमातून शहराला डिसेंबर २०२४ मध्ये पाणीपुरवठा केला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. शिवाय या योजनेतील विविध कामे केव्हा पुर्ण होऊ शकतील, याचेही वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केले आहेत. याच अनुषंगाने नविन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची बिडकिन व परिसरात न्यायाधीश रविंद्र घुगे, व आर. एम. जोशी यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कंत्राटदार यांना सुधारित पद्धतीने काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी सूचना हि यावेळी न्यायाधीश रविंद्र घुगे यांनी दिल्या असुन सह्योगनगर, रमानगर, निलजगाव फाटा आणि बिडकिन बसस्थानक परिसरात यावेळी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली आहे.

यावेळी कामाची गुणवत्ता व दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी तसेच सर्व जलवाहिनी चे काम सुव्यवस्थित व व्यवस्थापन करुनच व्हावे यासाठी कंत्राटदार यांनी प्रयत्न करावे अशा सूचना हि न्यायाधीश रविंद्र घुगे व आर. एम. जोशी यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com