

Statutory NDPS Incarceration: Filing Case 361/2026 Under Chalthana Police Jurisdiction
Sakal
चित्तेपिपंळगाव : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. झाल्टा फाटा ता . छत्रपती संभाजीनगर परिसरात सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) पावडरची वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे ७ लाख ३९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.