

Tragedy strikes during well construction
esakal
सचिन चोबे, सुनिल पांढरे
सिल्लोड: तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (ता.09) रात्रीच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विहिरीतील साचलेले पाणी काढण्यासाठी गेलेल्या बाप आणि दोन मुलांवर अचानक विहीर ढासळून मातीचा ढिगारा कोसळल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.