Chhatrapati Sambhajinagar : सुट्यांमुळे प्रवाशांची तुडुंब गर्दी; रेल्वे, एसटी,ट्रॅव्हल्स फुल्ल, ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagarsakal

Chhatrapati Sambhajinagar - उन्हाळ्याच्या सुट्या सुरु असल्याने एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्स बसला तुडूंब गर्दी झाली आहे. त्यामुळेच गर्दीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी आणि रेल्वे तिकीट बुकींग करणाऱ्या एजंटांमार्फत प्रवाशांची अक्षरशः लूट सुरु आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Mumbai Crime : मोलकरीण बनून घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने सर्वच वाहनांना तोबा गर्दी होत आहे. शाळांना सुट्या लागल्‍या असल्याने प्रवाशांची प्रचंड संख्या वाढली आहे. प्रवाशी संख्या वाढल्याने एसटीच्या बसगाड्या दुप्पट क्षमतेने प्रवाशी वाहतूक करत आहेत. अनेक बसगाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते.

Chhatrapati Sambhajinagar
Pune Theft : ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरटयांनी...

४५ सिटच्या एसटी बसमध्ये तब्बल ७० ते ८० प्रवाशी प्रवास करत असल्याची सध्याची स्थिती आहे. प्रत्येक गर्दीच्या सिझनमध्ये एसटीकडूनही हंगामी भाडेवाढ केली जाते, मात्र यंदा अजून एसटीने भाडेवाढ केली नाही, हा दिलासा प्रवाशांना आहे. एसटीला होत असलेल्या गर्दीचीच परिस्थिती रेल्वेगाड्यांचीही झालेली आहे. त्यामुळेच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशी भाड्यात दुप्पट वाढ केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु

खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी

प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे. गर्दी बघून भाडेवाढ करण्याचा नवा फंडा ट्रॅव्हल्सचालकांनी सुरु केला आहे. पूर्वी ठरावीक भाडेवाढ केली जात होती. आता मात्र ट्रॅव्हल्समध्ये किती सिट आहेत आणि मागणारे किती आहेत, याचा अंदाज घेऊन अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Mumbai Crime : मोलकरीण बनून घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

समजा पुणे जाणाऱ्या खासगी बसमध्ये दुपारपर्यंत केवळ पाच सिट शिल्लक आहेत. अशा वेळी कुणी तिकीट मागणी करण्यासाठी आला तर त्याला तीन-चार पट अधिक आकारणी केली जाते. तिकीट अधिक आहे म्हणून प्रवाशाने तिकीट घेतले नाहीत तरीही बस निघेपर्यंत आणखी अनेक प्रवासी येणार ही खात्री ट्रॅव्हल्सचालकांना असल्याने तिकीट कमी केले जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com