Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके! १४ गावे, ९ वाड्या-वस्त्यांना २१ टँकरचा आधार

Chhatrapati Sambhajinagar Faces Water Crisis as Tanker Demand Rises: छत्रपती संभाजीनगरमध्ये हिवाळ्यातच पाणीबाणी! ५२ हजार नागरिकांची तहान २१ टँकरवर
Chhatrapati Sambhajinagar Water Scarcity 52534 Residents Depend on Tankers as Water Shortage Worsens Before Summer

Chhatrapati Sambhajinagar Water Scarcity 52534 Residents Depend on Tankers as Water Shortage Worsens Before Summer

esakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड: पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. सध्या तालुक्यातील १४ गावे आणि नऊ वाड्या-वस्त्यांमधील ५२ हजार ५३४ नागरिकांची तहान २१ टँकरच्या ३७ खेपांद्वारे भागविली जात आहे. उन्हाळ्यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असताना आता पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात नागरिकांसह जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com